Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आहे.
तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जे घडलं त्याबद्दल मी समोरच्याला दोष देत नाही असं म्हटलं.
मात्र त्यानंतर त्यांचा घटस्फोट का झालेला याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.
'होणार सून मी या घरची' या मालिकेच्या सेटवर ते दोघे प्रेमात पडले होते.
त्यानंतर त्यांनी लग्न केलं. मात्र वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला.
त्यांच्या नात्यात इतका दुरावा आला की ते मालिकेच्या सेटवर देखील एकमेकांशी बोलत नव्हते.
मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
शशांकने या अर्जात असं लिहलं होतं तेजश्रीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते.
वारंवार जुनियर आर्टिस्ट म्हणून हिणवून मानसिक छळ करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचं त्याने सांगितलं असल्याचं बोललं जातं.
त्यांच्या घटस्फोटानंतर लवकरच ही मालिका संपवण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी शशांकने त्याची मैत्रीण प्रियांका हिच्यासोबत 2017 रोजी दुसरं लग्न केलं. तर तेजश्री अद्याप सिंगल आहे.