Apurva Kulkarni
तेजश्री प्रधान हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे.
तेजश्री नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचे अनुभव ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आयुष्य कसं जगायचं? याबाबत ती नेहमीच चाहत्यांना मार्गदर्शन करताना दिसत असते.
अशातच तिने माईन्ड युवर मूव्ही या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये तिने मालिकांविश्वावर बरीच चर्चा केली.
यावेळी बोलताना ती म्हणाली की, 'मालिकांमध्ये नायिकेचा छळ दाखवणं गरजेचं आहे. आम्हाला पटत नसलं तरी ते दाखवावं लागतं.'
'ग्रामीण भागातील महिला त्या पात्राला आपलसं समजतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की, अरे ही सगळ्यांतून खंबीर बाहेर येऊ शकते तर आपण का नाही?'
'नायिकेला आपल्यात बघून महिला स्वत:मध्ये बदल घडवतात. होणाऱ्या छळाचा सामना करुन खंबीर पुढं जाणं ते त्यांच्यात रुजवतात. त्यामुळे मालिकांमध्ये तसे सीन दाखवत असतात.'
तेजश्रीच्या मते मालिकेतील त्या सीनमुळे ग्रामीण भागातील महिलांवर प्रभाव पडतो, आणि त्या स्वत:मध्ये बदल घडवून आणतात.