Apurva Kulkarni
मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
बिग बॉसच्या 15 व्या सीजननंतर तेजस्वी प्रकाश खूप चर्चेत आली.
बिग बॉसमध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
गेल्या 3 वर्षापासून करण आणि तेजस्वी एकमेकांना डेट करत आहेत.
गेल्या काही दिवसापासून तेजस्वी आणि करणच्या लग्नाच्या चर्चा सुद्धा सोशल मीडियावर रंगत आहे.
पंरतु दोघांनी लग्न करण्यापूर्वी 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
करण आणि तेजस्वी हिच्या निर्णयाला तेजस्वीच्या पालकांनी सुद्धा परवानगी दिली आहे.
त्यांना भिती वाटते की, मागच्या ब्रेकअपनंतर यावेळी सुद्धा तिचं नातं खराब होऊ नये.
तेजस्वीने सांगितलं की, 'मी खूप चंचल आहे, त्यामुळे माझ्या आई-वडिलांना वाटतं की, आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं'