तेजस्विनी पंडीतने केलं तिच्या आयुष्यातील खडतर प्रसंगाविषयी भाष्य

Anuradha Vipat

आयुष्यातील खडतर प्रसंग

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने तिच्या आयुष्यातील खडतर प्रसंगाविषयी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. 

संघर्ष

करिअरच्या सुरुवातीच्या काळात तेजस्विनीला संघर्ष करावा लागला आहे

लाईटबिल भरलं नाही म्हणून

तेजस्विनी म्हणाली, अडीच महिने घरात लाईट नव्हती. लाईटबिल भरलं नाही म्हणून लाईट बंद केली होती. त्यावेळी मी एक जाहीरात केली. त्या जाहीरातीचे मला चांगले पैसे आले. ते पैसे आले की सगळ्यात आधी मी घराचं लाईट बिल भरलं.

अभिनेत्रीच्या घरात लाईट

एका अभिनेत्रीच्या घरात लाईट नसते. तेव्हा लोक तिच्याकडे कोणत्या नजरेने बघतात. हे मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही , असं तेजस्विनीने एका मुलाखतीत सांगितलं आहे

प्रसिद्ध अभिनेत्री

तेजस्विनी पंडीत ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सिनेमातील काम

तू ही रे या सिनेमातील तिचं काम प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे .

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सई ताम्हणकरने घेतली अलिशान गाडी, फोटो केले शेअर