Apurva Kulkarni
तेजस्विनीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिने अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळक निर्माण केली आहे.
एका मुलाखतीत तेजस्विनी म्हणाली की, 'तुमची परिस्थिती तुमचं क्षेत्र पाहून तुम्हाला काही गोष्टी विचारल्या जातात.'
एक किस्सा सांगताना तेजस्विनी म्हणाली, '२००९ ची घटना आहे. मी घरभाडं देण्यासाठी गेले तर त्या व्यक्तीने थेट मला ऑफर केली.'
'मला ऑफर केल्याक्षणी माझ्यासमोर फक्त एक पाण्याचा ग्लास होता आणि मी ते ग्लासातलं पाणी त्या व्यक्तीच्या तोंडावर फेकलं.'
पुढे बोलताना ती म्हणाली 'एक आंबा नासका निघाला की बाकीचे पण असतात असं म्हटलं जातं. पण खरंच दुसरे आंबे नासके आहेत का हे तपासा'
जेव्हा तेजश्री घर भाडं देण्यासाठी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये पोहचली तेव्हा तिला कळलं की, लोकांचा सिनेसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा आहे.
तेजस्विनी सिंहगड रोडला राहत असताना तिने नगरसेवकाच घर भाड्याने घेतलं होतं.
तेजस्विनीला तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच नगरसेवकाकडून वाईट अनुभव आल्याचं तिने मुलाखतीत सांगितलं.
दरम्यान आज तेजस्विनीचा वाढदिवस, 1986 साली पुण्यात तिचा जन्म झाला.