Pranali Kodre
आत्तापर्यंत टीव्हीवर अनेक पौराणिक मालिका दाखवण्यात आल्या आहेत.
अशा बऱ्याच पौराणिक मालिकांमध्ये विविध अभिनेत्यांनी भगवान महादेवांची भूमिका साकारली आहे. अशाच अभिनेत्याबद्दल जाणून घेऊ.
अभिनेता सौरभ राज जैन याने महाकाली अंत ही आरंभ है या मालिकेत भगवान शंकरांची भूमिका साकारली होती.
तरुण खन्नाने वेगवेगळ्या मालिकांमध्ये महादेवांची भूमिका निभावली आहे. यात राधाकृष्ण, देवी आदी पराशक्ती अशा वेगवेगळ्या पौराणिक मालिकांचा समावेश आहे.
मलखान सिंग याने विघ्नहर्ता गणेशा या मालिकेत भगवान शंकरांची भूमिका साकारली आहे.
रोहित बक्षी याने सियां के राम या मालिकेत महादेवांची भूमिका साकारली होती.
महादेवांच्या भूमिकेसाठी सर्वात जास्त चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे मोहित रैना. त्याने 'देवों के देव... महादेव' या मालिकेत ही भूमिका साकारली होती.