Shubham Banubakode
टेंबा बावुमा हा दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून सध्या तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे.
टेंबा बावुमाचा जन्म 17 मे 1990 रोजी केप टाऊनमधील लंगा येथे झाला.
त्याने न्यूलँड्स येथील साऊथ आफ्रिकन कॉलेज ज्युनियर स्कूल आणि सँडटॉन येथील सेंट डेव्हिड्स मॅरिस्ट इनांडा येथे शिक्षण घेतले.
टेंबा बावुमाची उंची 5 फूट 3 इंच आहे आणि त्याने आपल्या छोट्या उंचीचा फायदा घेत चपळता आणि मजबूत तंत्राने क्रिकेटमध्ये यश मिळवले.
बावुमाने 2008 मध्ये गौटेंगसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2010-11 मध्ये लायन्स फ्रँचायझीमध्ये स्थान मिळवले.
त्याने 26 डिसेंबर 2014 रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केले, तर 25 सप्टेंबर 2016 रोजी आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पणात शतक ठोकले.
2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध केप टाऊन येथे शतक ठोकून तो दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी शतक ठोकणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरला.
मार्च 2021 मध्ये बावुमा दक्षिण आफ्रिकेचा मर्यादित षटकांचा कर्णधार बनला, हा मान मिळवणारा तो पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरला.