Tender Coconut Tips : जास्त पाणी आणि गोड मलाईवाला नारळ कसा ओळखायचा? ट्राय करा सोपी ट्रिक

बाळकृष्ण मधाळे

जास्त पाणी आणि गोड मलाईवाला नारळ कसा ओळखायचा?

शरीर थंड आणि हायड्रेट ठेवण्यासाठी शहाळ्याचं पाणी उत्तम पर्याय आहे. मात्र, जास्त पाणी आणि चांगली मलाई असलेलं शहाळं निवडणं महत्त्वाचं आहे.

Tender Coconut Tips

|

esakal

पाणीदार शहाळं कसं ओळखायचं?

शहाळं घेताना त्याचा आकार, वजन, रंग आणि पाण्याचा आवाज याकडे लक्ष द्या. या काही सोप्या टिप्सच्या मदतीने चांगलं शहाळं निवडता येतं.

Tender Coconut Tips

|

esakal

गोल आकाराचं शहाळं निवडा

शहाळी गोल किंवा लांबट आकाराची असतात. लांबट शहाळ्यापेक्षा गोल आकाराच्या शहाळ्यात पाणी जास्त असण्याची शक्यता असते.

Tender Coconut Tips

|

esakal

शहाळं वजन करून पाहा

एकाच आकाराची दोन-तीन शहाळी हातात घेऊन त्यांचं वजन तपासा. जे शहाळं तुलनेने जड वाटेल, त्यात पाणी जास्त असण्याची शक्यता असते.

Tender Coconut Tips

|

esakal

शहाळं हलवून पाहा

शहाळं कानाजवळ धरून हलवा. जोरात खळखळ आवाज येत असेल तर आत रिकामी जागा जास्त असू शकते. मंद आवाज असल्यास त्यात पाणी अधिक असण्याची शक्यता असते.

Tender Coconut Tips

|

esakal

रंगही महत्त्वाचा

हिरवट रंगाचं शहाळं ताजं असण्याची शक्यता असते. गडद तपकिरी डाग अधिक असलेलं शहाळं तुलनेने जून झालेलं असू शकतं आणि त्यात पाणी कमी असू शकतं.

Tender Coconut Tips

|

esakal

मोठं म्हणजे जास्त पाणी नाही!

मोठं शहाळं म्हणजे त्यात जास्त पाणी असेलच असं नाही. मध्यम आकाराचं शहाळं निवडणं अधिक योग्य ठरू शकतं.

Tender Coconut Tips

|

esakal

पाणी की गोड मलाई?

जर तुम्हाला गोड आणि मऊ मलाई आवडत असेल, तर काही शहाळ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण तुलनेने कमी असू शकतं. त्यामुळे खरेदी करताना तुमची पसंती लक्षात घ्या.

Tender Coconut Tips

|

esakal

शहाळं ताजं प्या

शहाळं विकत घेतल्यानंतर शक्यतो लगेच प्या. जास्त वेळ ठेवण्यापेक्षा ताजं शहाळ्याचं पाणी पिणं चांगलं.

Tender Coconut Tips

|

esakal

Why Is the Crow Black? : कावळ्याचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या पौराणिक कथा आणि रंजक कारण

Why Is the Crow Black?

|

esakal

येथे क्लिक करा...