Shubham Banubakode
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील घाटलाडकी गावात उभा असलेला ठाकूर घराण्याचा ऐतिहासिक वाडा आजही आपल्या वैभवाची साक्ष देत आहे.
Thakur Wada Amravati, Ghatladki village
esakal
या वाड्याची उभारणी कुशल राजस्थानी कारागिरांनी केली आहे. प्रत्येक खांब, दरवाजा आणि लाकडी भागावर केलेले नक्षीकाम पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.
Thakur Wada Amravati, Ghatladki village
esakal
वाड्यातील अस्सल सागवानी लाकूड आजही तितकेच मजबूत आहे. काळाच्या ओघातही त्याची भक्कमता आणि सौंदर्य टिकून आहे.
Thakur Wada Amravati, Ghatladki village
esakal
शेकडो वर्षांपूर्वी उभारलेला हा वाडा आजच्या सिमेंट-काँक्रीटच्या इमारतींनाही गुणवत्ता आणि टिकाऊपणाच्या बाबतीत मागे टाकतो.
Thakur Wada Amravati, Ghatladki village
esakal
या वाड्यात धान्य साठवण्यासाठी भुयारी 'पेव' तयार करण्यात आले आहे. स्थानिकांच्या मते, यात तब्बल १०० क्विंटलपेक्षा अधिक धान्य सुरक्षित ठेवता येत असे.
Thakur Wada Amravati, Ghatladki village
esakal
१९५१ मध्ये बिहार आणि सन १९५२ मध्ये मद्रास येथे पडलेल्या दुष्काळाच्या काळात ठाकूर घराण्याने १०० क्विंटल ज्वारीचे दान केले होते. तत्कालीन पंतप्रधानांशी झालेल पत्रव्यवहार.
Thakur Wada Amravati, Ghatladki village
esakal
उन्हाळ्याच्या दिवसांत वाड्याबाहेरून जाणाऱ्या व्यक्तींची प्रतिमा आतल्या भिंतीवर उमटते. त्या काळातील स्थापत्यकलेतील हे एक अद्भुत वैज्ञानिक उदाहरण मानले जाते.
Thakur Wada Amravati, Ghatladki village
esakal
इतिहास, कला आणि पारंपरिक स्थापत्यशैली यांचा सुंदर संगम असलेला हा वाडा आजही विदर्भाच्या समृद्ध वारशाची ओळख करून देतो.
Thakur Wada Amravati, Ghatladki village
esakal
प्राचीन वास्तुकला, अनोखे रहस्य आणि सांस्कृतिक वारसा अनुभवायचा असेल, तर घाटलाडकी येथील ठाकूर वाडा तुमच्या पर्यटन यादीत नक्की असायला हवा.
Thakur Wada Amravati, Ghatladki village
esakal
vidarbha lal killa
esakal