पैलवानांचे सीक्रेट पॉवर ड्रिंक! रोज एक ग्लास पिल्यास शरीराला मिळतील 'हे' 10 फायदे

Vinod Dengale

पैलवानांचे सीक्रेट पॉवर ड्रिंक

पैलवानांसाठी थंडाई हे ताकद, स्टॅमिना आणि उत्तम आरोग्याचा नैसर्गिक खजिना मानले जाते.

पैलवान थंडाई का पितात?

थंडाईमध्ये दूध, बदाम, खसखस, बडीशेप, काजू आणि वेलदोडा यांसारखे पौष्टिक घटक असतात. जे व्यायामानंतर शरीराची रिकव्हरी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतात.

ताकद आणि स्टॅमिना वाढतो

थंडाईतील प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स स्नायूंना पोषण देतात. त्यामुळे शरीराची ताकद वाढते आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते.

शरीर थंड आणि हायड्रेट राहते

बडीशेप, गुलाब आणि खसखस यांसारखे घटक शरीरातील उष्णता कमी करतात. त्यामुळे उन्हाळ्यात थकवा, डिहायड्रेशन आणि हीटस्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.

हाडे आणि पचन मजबूत होते

दूध, बदाम आणि खसखसमधील कॅल्शियम हाडांना बळकट करते. तसेच बडीशेप आणि वेलदोडा पचन सुधारून अॅसिडिटी व गॅसची समस्या कमी करण्यास मदत करतात.

इम्युनिटी आणि मेंदूला फायदा

थंडाईतील अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. बदाम आणि केसर स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक ताजेपणा सुधारण्यास मदत करतात.

झोप आणि रिकव्हरीसाठी फायदेशीर

खसखस आणि गुलाब शरीराला शांतता देतात. त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते आणि कठोर व्यायामानंतर शरीराची रिकव्हरी जलद होते.

नैसर्गिक ताकदीचा खजिना!

योग्य प्रमाणात घेतल्यास थंडाई शरीराला ऊर्जा, स्टॅमिना, चांगले आरोग्य आणि ताजेपणा देऊ शकते. त्यामुळे अनेक पैलवान आजही या पारंपरिक पॉवर ड्रिंक आपल्या आहारात ठेवतात.

चाळीशीनंतर धावणे शक्य आहे का?

Running After 40

|

Sakal

हेही वाचा