Aarti Badade
भारतातील तंजावरचे बृहदीश्वर मंदिर आणि पुरीचे जगन्नाथ मंदिर यांच्याबाबत शिखराची सावली जमिनीवर पडत नसल्याची एक रंजक मान्यता प्रचलित आहे.
Shadowless Temple
Sakal
तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर चोल राजा राजराज प्रथम याने अकराव्या शतकात बांधले असून, १०१० मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले.
Shadowless Temple
Sakal
दुपारच्या वेळी मंदिराच्या शिखराची सावली दिसत नसल्याची चर्चा असते; मात्र प्रत्यक्षात सावली पडते, काही काळ ती मंदिराच्या पायथ्याजवळच लहान स्वरूपात दिसते.
Shadowless Temple
Sakal
सुमारे ६६ मीटर उंचीचे बृहदीश्वर मंदिर द्रविड स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. त्याची भव्य रचना आजही पर्यटकांना आकर्षित करते.
Shadowless Temple
Sakal
पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची येथे पूजा केली जाते.
Shadowless Temple
Sakal
या मंदिराच्या मुख्य शिखराची सावली जमिनीवर दिसत नसल्याची मान्यता आहे. मात्र, सावली अजिबात पडत नाही, याला ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
Shadowless Temple
Sakal
दोन्ही मंदिरांची भव्य वास्तुरचना, ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांच्याशी जोडलेल्या मान्यता आजही लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरतात.
Shadowless Temple
Sakal
Women in Peshwa Era
Sakal