Aarti Badade
हरिश्चंद्रगड किल्ला ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या रांगेत वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून ४००० फुट उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक उत्तम ठिकाण आहे.
हरिश्चंद्रगड किल्ल्याचा ऐतिहासिक संदर्भ प्राचीन अग्निपुराण आणि मत्स्यपुराण मध्ये आहे. राजा हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास यांच्या नावांशी जोडलेला किल्ला, मराठ्यांनी १७४७-४८ मध्ये मुघलांकडून घेतला होता.
उंच आणि धडकी भरवणारा अर्धगोलाकार कडा, जो ४५०० फुट उंच आहे. इथून ढगांमध्ये इंद्रवज्र दिसतो.
गडाच्या पायथ्याशी स्थित एक प्राचीन मंदिर, जिथून मंगळगंगेचा उगम होतो. अनेक गुहा देखील इथे आहेत.
या गुहेत एक विशाल शिवलिंग आहे, ज्याला पाणी साचलेले आहे. शंकर आणि गणपतीच्या मूर्ती या गुहेत कोरलेल्या आहेत.
गडावरचा सर्वोच्च शिखर, जिथून चारही बाजूंनी सुंदर दृश्ये दिसतात. इथे हिंदू लेणी आणि गणपती मूर्ती देखील आहेत.
पाचनई हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. इथे पोहोचून साधारणतः ३ तासांची चढाई आहे. मुंबई ते पाचनई: २०० किमी,पुणे ते पाचनई: १६४ किमी
खिरेश्वर गावापासून गडावर जाण्यासाठी साधारण ३ तास लागतात.मुंबई ते खिरेश्वर: १४० किमी, पुणे ते खिरेश्वर: ११५ किमी
अत्यंत अवघड मार्ग, जो ८-१२ तासांचा आहे. शिफारस केली जात नाही, फक्त अनुभवी ट्रेकर्ससाठी.
गुहेत राहायची सोय: ५०-६० लोकांची क्षमता असलेली गुहा उपलब्ध आहे.जेवण: स्थानिक हॉटेल्स आणि गावात जेवणाची चांगली सोय आहे.