Aarti Badade
महाड, कोकणाच्या रायगड जिल्ह्यात वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराने प्राचीन काळापासून विविध साम्राज्यांचा उदय आणि पतन पाहिले आहे.
महाडने भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजच्या काळात महाड एक समृद्ध आधुनिक शहर म्हणून ओळखले जाते.
महाड शहरातील चवदार तळे या सार्वजनिक पाण्याच्या टाक्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे भीमराव आंबेडकरांनी २,५०० दलित अनुयायांसह सत्याग्रह केला.
त्यांनी जातीभेद मोडून तिथून पाणी प्यायले, ज्यामुळे त्या काळातील जातिवादाला तडाखा बसला. आजही दरवर्षी अनेक अनुयायी येथे येतात.
महाडचा इतिहास मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजाशी निगडीत आहे. रायगड किल्ला, जो शिवाजी महाराजांची समाधी ठिकाण आहे, महाडपासून २४ किमी दूर स्थित आहे. रायगड किल्ल्याचा इतिहास महाडच्या सांस्कृतिक धरोहरचा एक महत्त्वाचा भाग आहे.
शिवथरघळ हा समर्थ रामदास स्वामींचा जन्मस्थळ आहे. त्यांच्या 'दासबोध' या ग्रंथाचा महाडच्या आध्यात्मिक इतिहासात मोठा ठसा आहे. ही जागा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची आहे.
महाड हे एकेकाळी एक प्रमुख व्यापारी बंदर होते. विशेषतः कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गुळाची निर्यात महाडमार्गे गुजरातला होत असे.
मात्र, काळाच्या ओघात सावित्री नदीचे काठ बदलल्यामुळे महाड आज बंदर नाही, पण ते एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते.
महाड जवळील गंधरपाळे बौद्ध लेणींचा पुराणकथांमध्ये उल्लेख आहे. या लेण्यांची रचना पांडवांनी केली असं सांगितलं जातं
परंतु त्या कालखंडात बौद्ध राजकुमार विष्णुपालीत कणभोज यांच्या राजवटीत या लेणींची निर्मिती केली गेली.
२०१६ मध्ये महाडला मोठा पूर आला ज्यामध्ये ४२ लोकांचा मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं.
महाड शहरातील नद्या आणि भूस्खलनामुळे बाजारपेठा आणि जुनी इमारती नष्ट झाल्या.
महाड हे सह्याद्री पर्वताच्या कुंडलात वसलेले असून, सावित्री नदीच्या काठावर स्थित आहे. या शहरामध्ये उष्णकटिबंधीय हवामान असून पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो.
महाडमध्ये रायगड किल्ला, शिवथरघळ, गंधरपाळे बौद्ध लेणी आणि इतर अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. येथे प्रचंड निसर्ग सौंदर्य, धबधबे, आणि समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत.
महाड शब्द 'महा' (मोठा) आणि 'हाट' (बाजार) यापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ "मोठा बाजार" असा होतो. महाडचा सर्वात जुना उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये इ.स.पूर्व २२५ मध्ये दिसतो.