Puja Bonkile
आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणच्या हवामानानुसार कपड्यांची निवड करावी.
बाहेर फिरताना पायांत अगदी स्पोर्टस शूज नसले तरी पाय बंद राहतील असे आरामदायी शूज शक्यतो असावेत.
तुम्हाला फोटो काढण्याची आवड असेल तर कॅमेरा हे नीट चार्ज करून घ्यावा.
त्याऐवजी शक्य असेल तर खांद्यांवर क्रॉस करून घालता येईल अशी बॅग घ्यावी.
घरात असतील तेवढी सौंदर्यप्रसाधनं बरोबर घेऊ नयेत, अगदी आवश्यक तेवढीच घ्यावीत. त्यांच्याशिवायही कम्फर्टेबल राहावं.
खाण्याचं सामान घरून फार नेऊ नये. आपण जिथे जात आहोत तिथले पदार्थ ट्राय करावे. मुलं बरोबर असतील तर त्यांना आवडणाऱ्या खाण्याच्या काही गोष्टी घ्यायला हरकत नाही.
वरील सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास प्रवास सुखकर होईल.