Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराज आजारी होते. यावेळी इंग्रजांनी मद्रासहून शिवाजी महाराजांकडे एक खास पाठवणी करण्याचा निर्णय घेतला.
ही पाठवणी कोणत्याही राजनैतिक हेतूने नव्हती, तर थेट महाराजांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी होती.
इंग्रजांनी निवडक आणि महागड्या औषधांचा संग्रह करून त्याची व्यवस्थित यादी तयार केली.
त्यामध्ये तीन ‘cordiall stones’ नावाचे औषध होते, जे सुमारे १ औंस (वजन मोजण्याचे एकक) १० डेडवेट टनेज वजनाचे होते.
या औषधाची किंमतच १ फणम (मध्ययुगीन भारतातील नाणे) आणि २० शिलिंग (ब्रिटिश वसाहती वापरले जाणारे चलन) होती
पुढे दोन ‘Pedras de Budgee’ आणि चार ‘Pedras de Bugia’ अशा प्रकारांची नोंद आहे, एकूण खर्च १० फणम.
‘Cocko das Ilhas’ हे औषध ४ औंस ७ ड्वेट एवढ्या वजनाचं, त्याची किंमत तब्बल ४४ फणम (मध्ययुगीन भारतातील नाणे)
‘Carangueje de pedra’ नावाचं एक औषध पाठवण्यात आलं, ज्याची किंमत ५ फणम (मध्ययुगीन भारतातील नाणे) होती.
या औषधांच्या दुसऱ्या संचासाठी इंग्रजांनी ‘Pagodas’ (सोन्याचे बनलेले नाणे) हे स्थानिक चलन वापरलं.
सर्व औषधांचा एकत्रित खर्च ६०.२० Pagodas (ब्रिटिश वसाहती वापरले जाणारे चलन) इतका होता. म्हणजे आताच्या चलनात अंदाजे २१०.७ रुपये
ही पाठवणी केवळ औषधांची नव्हती, तर इंग्रजांकडून एक प्रकारची सदिच्छाही होती.
ही ऐतिहासिक माहिती आपल्याला १४ मे १६७७ च्या English Records on Shivaji आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज: उत्तरार्ध’ वा. सी. बेंद्रे या ग्रंथांतून मिळते.