सकाळ वृत्तसेवा
शाहजहानने बनवलेलं मयूर सिंहासन हे ताजमहालपेक्षा दुप्पट महाग होतं. सोनं, हिरे, माणकं, पाचू आणि मोत्यांनी सजलेलं हे जगातील सर्वात भव्य सिंहासन होतं.
शाहजहानने 1628 मध्ये गादीवर बसल्यानंतर उस्ताद साद इ गिलानी याला हे सिंहासन तयार करण्याचं काम दिलं. यासाठी 7 वर्षे आणि लाखो तोळे सोनं लागलं.
सिंहासनावर दोन मोरांची रत्नजडित आकृती होती. 108 माणकं, 116 पाचू, 12 कॉलम्स आणि रत्नजडित छत्री याने ते अतिशय भव्य दिसायचं.
कलीम, सैदा आणि कुदसि या कवींच्या कविता सिंहासनावर कोरलेल्या होत्या.
1665 मध्ये फ्रेंच प्रवासी ट्रेव्हर्नियरला सिंहासन जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्याने सांगितले की सिंहासन सुमारे 6x4 फूटाचं असून पूर्ण रत्नांनी झाकलेलं होतं.
1665 मध्ये याची किंमत 10 कोटी 70 लाख रुपये होती. आजच्या हिशोबाने याची किंमत सुमारे 1.35 लाख कोटी रुपये होती.
1739 मध्ये नादिरशाहने दिल्लीवर आक्रमण केलं आणि मयूर सिंहासनासह कोहिनूर, आणि इतर मौल्यवान रत्नं घेऊन गेला.
1747 मध्ये नादिरशाहच्या मृत्यूनंतर सिंहासनाचा पत्ता लागला नाही. काहींचं म्हणणं आहे की ते तुकड्यांत फोडलं गेलं आणि रत्नं वेगळी केली गेली.
कोहिनूर नादिरशाहनंतर दुर्रानीकडे, मग शीख साम्राज्याकडे आणि शेवटी 1849 मध्ये ब्रिटिश शाही खजिन्यात गेलं.
मूळ सिंहासन हरवल्यावर मुघलांनी त्याची प्रतिकृती तयार केली. तीही 1857 मध्ये लुटली गेली.