Aarti Badade
उन्हाळ्यात शरीर थंड करण्यासाठी अनेकजण मद्यपान करतात, पण प्रत्यक्षात हे मिश्रण शरीरासाठी अत्यंत प्राणघातक ठरू शकते. कडक ऊन आणि अल्कोहोल एकत्र आल्यास शरीराची नैसर्गिक यंत्रणा कोलमडू शकते.
Dangers of alcohol in summer
Sakal
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आधीच कमी होते. दारू ही 'डाययुरेटिक' (Diuretic) असल्याने लघवीचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे शरीर वेगाने कोरडे पडते आणि गंभीर निर्जलीकरण होऊ शकते.
Dangers of alcohol in summer
Sakal
अल्कोहोलमुळे शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. कडक उन्हात दारू पिल्याने शरीराचे तापमान ४०°C च्या वर जाऊ शकते, ज्यामुळे उष्माघाताचा मोठा धोका निर्माण होतो.
Dangers of alcohol in summer
Sakal
उन्हाळ्यात जास्त मद्यपान केल्याने हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात आणि रक्तदाब (Blood Pressure) वाढतो. या स्थितीमुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.
Dangers of alcohol in summer
Sakal
पाणी आणि शरीरातील महत्त्वाचे क्षार (Salts) कमी झाल्यामुळे प्रचंड थकवा, चक्कर येणे, मळमळ आणि तीव्र डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Dangers of alcohol in summer
Sakal
नशेत निर्णयक्षमता कमी होते आणि शरीराचे संतुलन बिघडते. उन्हाळ्यात मद्यपान करून पोहायला जाणे किंवा गाडी चालवणे यामुळे अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो.
Dangers of alcohol in summer
Sakal
दारू जरी "थंड" वाटत असली, तरी ती शरीराला आतून कोरडे करते. उन्हाळ्याच्या दिवसात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मद्यपान टाळणे आणि जास्तीत जास्त पाणी किंवा नैसर्गिक पेये घेणेच हिताचे आहे.
Dangers of alcohol in summer
Sakal
Blood sugar control exercise
Sakal