पेशवेपदी आल्यावर कर्जबाजारी झालेले बाजीराव, सासऱ्यांनी दिलेल्या पैशातून...

सकाळ वृत्तसेवा

तेजस्वी परंपरेची वारसदार

श्रीमंत पेशव्यांची अर्धांगीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशिबाई यांचा खरा इतिहास फार थोड्या लोकांना माहिती आहे.

Peshwa Bajirao | Sakal

खरा इतिहास वेगळा

सुवर्ण अलंकार, मोत्यांचे मुकुट यामधील श्रीमंती ही फक्त झलक होती. खरा इतिहास वेगळा आणि समृद्ध होता.

Peshwa Bajirao | Sakal

महादजी कृष्ण जोशी चासकर यांची कन्या

काशिबाई या महादजी कृष्ण जोशी चासकर यांच्या कन्या होत्या. चासकर जोशी घराणं पराक्रमी आणि संपन्न होतं.

Peshwa Bajirao | Sakal

पूर्वजांचा पराक्रम

काशिबाईंचे चुलते रामचंद्र महादेव हे पराक्रमी लढवय्ये होते. चासकर जोशी घराण्याला पराक्रमाचा वारसा लाभलेला होता.

Peshwa Bajirao | Sakal

आर्थिक संपन्नतेत दिवाण महादजी जोशी पुढे

महादजी जोशी हे बाळाजी विश्वनाथांच्या आधीपासून दिवाण होते आणि बाळाजींपेक्षा श्रीमंतही होते.

Peshwa Bajirao | Sakal

विवाह सोहळ्याचा भव्य खर्च

बाजीराव-काशिबाई यांच्या विवाहासाठी महादजी जोशींनी ₹२५,००० खर्च केले; तर बाळाजी विश्वनाथांनी केवळ ₹५,०००.

Peshwa Bajirao | Sakal

बाजीराव होते कर्जबाजारी

पेशवेपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर बाजीराव आर्थिक अडचणीत सापडले होते.

Peshwa Bajirao | Sakal

महादजींची उदार मदत

त्या वेळी महादजी जोशींनी बाजीरावांना तब्बल ₹२ लाखांची मदत केली होती — ते आर्थिक आधारस्तंभ म्हणून उभे राहिले.

Peshwa Bajirao | Sakal

श्रीमंतीपेक्षा मोठा होता त्याग आणि वारसा

काशिबाईंचा इतिहास हा केवळ श्रीमंतीपुरता मर्यादित नाही. तो पराक्रम, त्याग आणि कर्तृत्वाने भरलेला आहे.

Peshwa Bajirao | Sakal

'या' महालात व्हायचा पेशवाईचा नृत्यविलास, रंगपंचमी ते लग्नाचे रिसेप्शन

Hirabagh Palace | Sakal
येथे क्लिक करा