'या' महालात व्हायचा पेशवाईचा नृत्यविलास, रंगपंचमी ते लग्नाचे रिसेप्शन

सकाळ वृत्तसेवा

पुण्याचा हिराबाग

पर्वती पायथ्याशी वसलेली हिराबाग, नानासाहेब पेशव्यांनी १७५५ साली खासगी वापरासाठी उभारलेली शाही बाग होती. ही बाग पेशवाई स्थापत्यशैली आणि समारंभांची साक्ष होती.

Hirabagh Palace | Sakal

स्थापत्यशैलीतील पेशवाई ठसा

दिवाणखाना, नक्षीदार शिसवी खांब, महिरपी आणि लाकडी छत – हिराबागेतील घर हे पेशवाई स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे.

Hirabagh Palace | Sakal

निसर्गसंपन्न बाग

१४ एकरांमध्ये पसरलेल्या हिराबागेत फळझाडं, द्राक्षवेलींनी वेढलेलं कारंजं आणि सुंदर बागकाम पाहायला मिळत असे. पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आणि भव्य चौक होता.

Hirabagh Palace | Sakal

पेशवेकालीन समारंभांचे ठिकाण

पहिल्या माधवराव पेशव्यांच्या विवाहभोजनापासून ते रंगपंचमी व वसंतपंचमीच्या सोहळ्यांपर्यंत अनेक उत्सव इथे मोठ्या थाटात पार पडत.

Hirabagh Palace | Sakal

इंग्रज पाहुण्यांना शाही मेजवानी

दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इ.स. १८०३ मध्ये लॉर्ड व्हेलेन्शिया व इंग्रज अधिकाऱ्यांसाठी अस्सल मराठमोळ्या पद्धतीची भोजन व्यवस्था केली होती.

Hirabagh Palace | Sakal

व्हेलेन्शियाचे प्रवासवर्णन

व्हेलेन्शियाने ‘Valencia’s Travels’ मध्ये हिराबागेतील जेवण, रांगोळ्या, सोन्याचे फुलांचे पाट व सजावट यांचे कौतुक करून सविस्तर लिहिले आहे.

Hirabagh Palace | Sakal

नृत्य, संगीत आणि विलास

शाही जेवणानंतर दिवाणखान्यात संगीत, नृत्य आणि कलावैभवाचे कार्यक्रम आयोजित केले जात. इंग्रज पाहुण्यांसाठी हा एक विलक्षण अनुभव असे.

Hirabagh Palace | Sakal

टाऊन हॉलचा नवा जन्म

इ.स. १८७४ मध्ये न्या. रानडे व पुण्यातील मान्यवरांनी हिराबाग विकत घेऊन टाऊन हॉल कमिटी स्थापन केली. यानंतर अनेक सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम इथे झाले.

Hirabagh Palace | Sakal

ऐतिहासिक व्याख्यान व सभा

इ.स. १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांनी येथे शिवजन्मोत्सवाची सभा घेतली. १८९७ मध्ये स्वामी विवेकानंदांचे ऐतिहासिक व्याख्यान इथे पार पडले.

Hirabagh Palace | Sakal

हरवलेली ओळख

आज बाग उजाड झाली, तलाव आटला, स्टेडियम उभारले गेले. पण नानासाहेब पेशव्यांची हिराबाग अजूनही पेशवाई वैभवाची आठवण करून देते.

Hirabagh Palace | Sakal

RCB जिंकल्यानंतर 'ते' तमिळ गाणं व्हायरल होण्याचं कारण काय? विराटच खास संबंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli | RCB | IPL 2025 | Sakal
येथे क्लिक करा