Aarti Badade
जैन धर्मात कबुतरांना शांत, निरुपद्रवी व अहिंसक पक्षी मानलं जातं.
कबुतरांना अन्न-पाणी देणं, कबुतरखाने उभारणं हे पुण्य मानलं जातं.
जैन धर्मानुसार प्रत्येक जीव म्हणजे आत्मा, त्यामुळे त्यांच्याशी करुणेने वागणं आवश्यक.
कबुतरांसाठी नियमित धान्य व पाणी देण्याची सोय अनेक जैन मंदिरांत असते.
करुणा, दया आणि अहिंसेचं मूर्त रूप म्हणून कबुतरांकडे पाहिलं जातं.
स्थानिक सुभेदार कासुर्डे सांगतात, "जसं हिंदू समाज गायीला पूजतो, तसं जैन कबुतरांना पूजतो."
कबुतर तडफडत असेल, तर जैन समाज त्याचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतो.
संशोधनात असे आढळले की कबुतरांच्या विष्ठेमुळे कॅन्सर किंवा इतर श्वसन रोगांचा धोका संभवतो.
या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतरखाना हटवण्याच्या निर्णयावरून जैन समाज आक्रमक झाल्याने वादाला तोंड फुटले आहे.