इतिहास की भयकथा? पुण्याचा शनिवार वाडा का भुताच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे?

Aarti Badade

पुण्याचा शनिवारवाडा

मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास सांगणारा शनिवारवाडा केवळ त्याच्या स्थापत्यासाठीच नाही, तर तिथे घडलेल्या एका काळ्या घटनेमुळे आणि 'भुताच्या कथांमुळे' जगभर प्रसिद्ध आहे.

Shaniwar Wada History or Mystery

|

Sakal

पेशव्यांचे भव्य मुख्यालय

१७३२ मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांनी हा किल्ला बांधला. एकेकाळी हे मराठा साम्राज्याचे सत्ताकेंद्र होते, पण १७७३ मध्ये इथे अशा एका घटनेचा थरार घडला ज्याने इतिहास बदलला.

Shaniwar Wada History or Mystery

|

Sakal

नारायणराव पेशव्यांची निर्घृण हत्या

सत्तेच्या लालसेपोटी केवळ १८ वर्षांच्या नारायणराव पेशव्यांची त्यांच्याच महालात हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येच्या कटामागे त्यांचे काका रघुनाथराव आणि काकी आनंदीबाई असल्याचे मानले जाते.

Shaniwar Wada History or Mystery

|

Sakal

'काका मला वाचवा!'

हल्लेखोरांपासून वाचण्यासाठी धावताना तरुण नारायणराव "काका मला वाचवा!" अशी आर्त साद घालत होते. हीच हाक आजही शनिवारवाड्याच्या भिंतींमध्ये जिवंत असल्याचे स्थानिक मानतात.

Shaniwar Wada History or Mystery

|

Sakal

पौर्णिमेची ती भयाण रात्र

स्थानिक लोक आणि पर्यटकांच्या दाव्यानुसार, पौर्णिमेच्या रात्री आजही वाड्याच्या परिसरात एका लहान मुलाचा ओरडण्याचा आवाज येतो. त्यामुळेच रात्रीच्या वेळी हा परिसर काहीसा भीतीदायक वाटतो.

Shaniwar Wada History or Mystery

|

Sakal

विचित्र आवाज आणि सावल्या

अनेक पर्यटकांनी रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या आत विचित्र हालचाली आणि गूढ सावल्या पाहिल्याचा दावा केला आहे. आगीच्या घटनेत वाडा जळून खाक झाला असला, तरी त्यातील ऊर्जा आजही जाणवते असे म्हणतात.

Shaniwar Wada History or Mystery

|

Sakal

लाईट अँड साऊंड शो

आज शनिवारवाडा हे पुण्याचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे होणारा 'लाईट अँड साऊंड शो' पर्यटकांना पेशवाईचा इतिहास आणि त्यातील गूढ घटनांची सफर घडवून आणतो.

Shaniwar Wada History or Mystery

|

Sakal

इतिहास आणि रहस्याचा संगम

तुम्ही कधी शनिवारवाड्याला भेट दिली आहे का? ऐतिहासिक वास्तू आणि तिथल्या थरारक कथांमुळे हा किल्ला आजही इतिहासप्रेमी आणि रहस्यप्रेमींसाठी एक मोठे आकर्षण आहे.

Shaniwar Wada History or Mystery

|

Sakal

मुघलांच्या राज्यात कसा साजरा व्हायचा ख्रिसमस? औरंगजेबाने तर...

How was Christmas celebrated in the Mughal empire

|

esakal

येथे क्लिक करा