Aarti Badade
दक्षिण गोव्यातील माजोर्डा आणि कोलवा दरम्यान 'बेतालबातिम' (Betalbatim) हा एक अत्यंत शांत, स्वच्छ आणि सोनेरी वाळूचा सुंदर समुद्रकिनारा आहे.
Betalbatim Beach Glowing Goa
Sakal
बेतालबातिम बीच रात्रीच्या वेळी निळ्या-हिरव्या रंगात चमकतो. विज्ञानाच्या भाषेत याला 'बायोल्युमिनेसेन्स' (Bioluminescence) म्हणतात, जे एक दुर्मिळ दृश्य आहे.
Betalbatim Beach Glowing Goa
Sakal
जेव्हा समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात, तेव्हा पाण्यातील सूक्ष्मजीव (Microorganisms) नैसर्गिक प्रकाश निर्माण करतात, ज्यामुळे संपूर्ण किनारा उजळून निघतो.
Betalbatim Beach Glowing Goa
Sakal
या किनाऱ्याला अनेकदा 'सनसेट बीच' असेही म्हटले जाते. येथील सूर्यास्ताचा नजारा इतका विलोभनीय असतो की तुम्ही तासनतास येथे हरवून जाल.
Betalbatim Beach Glowing Goa
Sakal
हा किनारा उंच पाइन वृक्षांनी वेढलेला असून येथे डॉल्फिन दर्शन आणि पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येतो. शांत वातावरणात 'बीच वॉक'साठी हे उत्तम ठिकाण आहे.
Betalbatim Beach Glowing Goa
Sakal
बेतालबातिम बीचवर खाण्यापिण्याची उत्तम सोय असून येथील 'सीफूड' चवीसाठी जगप्रसिद्ध आहे. येथील नाईट लाईफचा अनुभवही अत्यंत खास असतो.
Betalbatim Beach Glowing Goa
Sakal
मडगाव रेल्वे स्टेशनवर उतरून तुम्ही टॅक्सी, ऑटो किंवा भाड्याच्या स्कूटरने सहज बेतालबातिम बीचवर पोहोचू शकता. उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे ट्रिप नक्की प्लॅन करा!
Betalbatim Beach Glowing Goa
Sakal
Aga Khan Palace Pune history
Sakal