Monika Shinde
रताळ्यात आयर्न, कॅल्शिअम, आणि व्हिटॅमिन्स असल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते.
ते हाडांच्या मजबुतीसाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
रताळ्यात बिटाकॅरोटीन आढळतो, जो शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतो आणि कॅन्सरचा धोका कमी करतो.
रताळ्यात पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
रताळ्यात जास्त फायबर्स असल्यामुळे पचन चांगले होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
कमी कॅलोरी आणि जास्त फायबर असल्यामुळे रताळे वजन कमी करण्यास मदत करतात.
रताळे उकडून, भाजून किंवा सूपमध्ये घ्या. तसेच शिरा किंवा हलवा तयार करू शकता.