Aarti Badade
ज्वारीचे पीठ (Jowar Flour) वापरून बनवलेले हे लाडू पौष्टिक आणि पचायला हलके असतात. लहान मुले आणि मोठ्यांसाठी प्रथिने (Protein), लोह आणि कॅल्शियम चा हा उत्तम स्रोत आहे.
Sakal
१ कप ज्वारीचे पीठ,१/२ ते ३/४ कप गूळ (किसलेला),२ ते ३ चमचे तूप,१/४ कप शेंगदाण्याचा कूट (ऐच्छिक),वेलची पूड (चवीनुसार)
Sakal
एका कढईत ज्वारीचे पीठ घ्या. ते मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत भाजा. पीठ चिकट होणार नाही, याची काळजी घ्या.
Sakal
भाजलेले पीठ एका भांड्यात काढून घ्या. त्यात किसलेला गूळ, शेंगदाण्याचा कूट आणि वेलची पूड घालून नीट मिसळा.
Sakal
मिश्रण तयार झाल्यावर त्यात २-३ चमचे तूप घाला.मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून घ्या. लाडू वळण्यासाठी मिश्रण कोमट (Lukewarm) ठेवावे.
Sakal
मिश्रण कोमट असतानाच, हाताला थोडे तूप लावून त्याचे छोटे-छोटे लाडू वळा. टीप - मिश्रण जास्त गरम किंवा थंड झाल्यावर वळल्यास लाडू सुटसुटीत होऊ शकतात.
Sakal
लाडू अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही त्यात सुका मेवा (Dry Fruits) किंवा किसलेले खोबरे (Coconut) यांसारखे घटक घालू शकता. लाडू पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.
Sakal
Sakal