Aarti Badade
'रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा' असे म्हटले जाते, पण हेच सफरचंद काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. सफरचंदाचे अतिसेवन किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
Apple allergy symptoms
Sakal
ज्या लोकांना सफरचंदाची ॲलर्जी आहे, त्यांना हे फळ खाल्ल्यावर त्वचेवर रॅशेस उठणे, खाज येणे किंवा सूज येणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. अशा लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
Apple allergy symptoms
Sakal
ज्या व्यक्तींना वारंवार ॲसिडिटी किंवा 'ॲसिड रिफ्लक्स'चा त्रास होतो, त्यांनी सफरचंदाचे अतिसेवन टाळावे. यामुळे छातीतील आणि पोटातील जळजळ वाढण्याची शक्यता असते.
Apple allergy symptoms
Sakal
सफरचंदात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे, त्यांना सफरचंद खाल्ल्याने पोट फुगणे (Bloating) आणि गॅस होण्याचा त्रास होऊ शकतो.
Apple allergy symptoms
Sakal
सफरचंदात नैसर्गिक साखर असते. जरी हे फळ मधुमेहासाठी उत्तम मानले जात असले, तरी रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यासाठी मधुमेही रुग्णांनी याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.
Apple allergy symptoms
Sakal
सफरचंदामध्ये पोटॅशियमचे प्रमाण लक्षणीय असते. किडनीच्या व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी जास्त पोटॅशियम घातक ठरू शकते, त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.
Apple allergy symptoms
Sakal
ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे, त्यांना सालासकट सफरचंद पचवणे जड जाऊ शकते. अशा लोकांनी सफरचंदाचे साल काढून किंवा मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करणे हिताचे ठरते.
Apple allergy symptoms
Sakal
Period acne home remedies
Sakal