सकाळ डिजिटल टीम
द्राक्षवेल मूळचा पश्चिम आशियातील कॅस्पियन समुद्र प्रदेश किंवा कॉकसस पर्वतातील असल्याचे मानले जाते.
द्राक्षाच्या ५०-६० जातींपैकी फक्त ५ भारतात आढळतात. यातील ‘बंगलोर ब्ल्यू’ ही जात मद्यनिर्मितीसाठी वापरली जाते.
ईजिप्तमध्ये ६,००० वर्षांपूर्वीपासून द्राक्षाची लागवड केली जात आहे. ग्रीक आणि रोमन लोकांनीही त्याच्या विकासात मोठी भूमिका बजावली.
बायबलमध्ये नोआने तयार केलेल्या द्राक्षाच्या मळ्याचा उल्लेख आहे, तर रोमन शास्त्रज्ञ प्लिनीयस यांनी द्राक्षाचे ९१ प्रकार सांगितले आहेत.
युरोप, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील उपोष्ण भागांत वेगवेगळ्या जाती आढळतात. अनेक नवीन प्रकार यूरोपीय व अमेरिकी जातींच्या संकरातून तयार झाले.
इराण व अफगाणिस्तानातून इ.स. १३०० च्या सुमारास द्राक्षवेल भारतात आली असावी, असे काही संशोधक मानतात. पण हा दावा खरा नाही.
पाणिनीचा अष्टाध्यायी, महाभारत, अर्थशास्त्र, चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि बृहत्संहितेत द्राक्षाचा उल्लेख आहे.
भारतात द्राक्षाचा उपयोग औषधी, खाद्य आणि मद्यनिर्मिती यासाठी केला जात होता, असे संस्कृत ग्रंथांवरून स्पष्ट होते.
आज भारतात नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड होते आणि ती देश-विदेशात निर्यातही केली जाते.