सकाळ डिजिटल टीम
मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि टॅबलेटसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरामुळे स्क्रीन टाइम लक्षणीय वाढला आहे.
स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम वाढत आहेत
स्क्रीन टाइमचा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम, त्याची काही महत्वाची कारणे आहेत.
त्यातून निर्माण होणारी ‘कम्प्युटर आय सिंड्रोम’ (सीव्हीसी) ही समस्या वाढत आहे.
स्क्रीनमधून निघणारा प्रकाश डोळ्यांना थकवा देतो, आणि डोळ्यांच्या स्नायूंवर ताण वाढतो.
मोबाइल्स आणि टॅब्लेट्स लहान मुले आणि तरुण जवळून वापरतात, ज्यामुळे दृष्टीवर नकारात्मक परिणाम होतो.
स्क्रीनसमोर बसताना योग्य पोझिशन न घेतल्यास डोळ्यांच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण पडतो.