सकाळ वृत्तसेवा
आज महाराष्ट्राचे राजकारण गाजवणारे राज ठाकरे एकेकाळी मोठा क्रिकेटर होण्याचा स्वप्न पाहत होते.
राज ठाकरे यांना लहानपणी क्रिकेटची जबरदस्त आवड होती. ते गल्ली क्रिकेटमध्ये नेहमी खेळायचे.
राज गल्ली क्रिकेटमध्ये त्यांच्या अंडर आर्म बॉलिंगसाठी प्रसिद्ध होते. सहा-सात वर्षांच्या वयातच त्यांचा फॉर्म भारी होता.
क्रिकेटची गोडी वाढत गेल्याने त्यांना कोच अण्णा वैद्य यांच्याकडे पाठवण्यात आलं. ते नेटमध्ये सराव करत असत.
एकदा प्रॅक्टिसदरम्यान वेगवान चेंडू थेट त्यांच्या पायावर लागला. त्यामुळे त्यांचा पाय सुजला.
राज घरी परतले तेव्हा बाळासाहेब ठाकरे रागावले. "पायावर निभावलं, हाताला लागलं असतं तर?" असा सवाल त्यांनी केला.
बाळासाहेबांनी त्यांना स्पष्ट संदेश दिला: "तुला चित्रकार व्हायचंय ना? मग त्यावर लक्ष दे. नाहीतर धड चित्रकार होशील ना क्रिकेटर!"
बाळासाहेबांच्या बोलण्याचा राज ठाकरे यांच्यावर परिणाम झाला. त्यांनी क्रिकेटचा नाद सोडून चित्रकलेकडे वळण्याचा निर्णय घेतला.
धवल कुलकर्णी यांच्या ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख आहे. हा क्षण राज ठाकरे यांच्या आयुष्यात वळण घेणारा ठरला.