Aarti Badade
दाबेली ही एक अनोखी स्ट्रीट फूड डिश आहे जी आज महाराष्ट्रातही खूप लोकप्रिय झाली आहे.
हा शब्द गुजराती भाषेत 'दाबलेली' असा अर्थ सांगतो. ती हलकीशी दाबल्यामुळे हे नाव तिला मिळाले.
या चवदार डिशचा जन्म 1960 च्या दशकात गुजरातमधील कच्छ भागातील मांडवी या छोट्याशा शहरात झाला.
केशवजी मालम नावाच्या स्ट्रीट वेंडरने ही डिश प्रथम तयार केली आणि केवळ एका आण्यात विकली जाई.
आजही मांडवीत त्यांचं मूळ दुकान आहे आणि केशवजींच्या कुटुंबाकडून ते चालवलं जातं.
मुंबई राज्याचे विभाजन झाल्यावर, अनेक लोकांनी स्थलांतर केले आणि दाबेली महाराष्ट्रात आली.
दाबेली लवकरच पुणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरांत स्ट्रीट फूड म्हणून प्रचंड लोकप्रिय झाली.
वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या भागांमध्ये विक्रेत्यांनी त्यात थोडेफार बदल करून नवनवीन प्रकार तयार केले आहेत.
दाबेली दिसायला वडापावसारखी वाटते, पण चव आणि साहित्य वेगळे असल्यामुळे तिला 'देसी बर्गर' असंही म्हणतात.