विदर्भाचं खजुराहो, जिथे प्रत्येक भिंतीवर बोलतो इतिहास! पाहा फोटो

Aarti Badade

विदर्भाचं खजुराहो: मार्कंडेश्वर मंदिर

गडचिरोलीच्या वैणगंगा काठावर वसलेलं हे मंदिर – अध्यात्म, निसर्ग आणि स्थापत्यकलेचा संगम!

Markandeshwar Temple | Sakal

भगवान मार्कंडेयांचं तपोभूमीस्थान

अत्यंत भक्तीमय आणि पुराणप्रसिद्ध ऋषी मार्कंडेय यांचं हे तपोस्थान – आजही भक्तांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र.

Markandeshwar Temple | Sakal

मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व

मार्कंडेय ऋषींच्या कठोर तपस्येमुळे प्रसन्न झाले भगवान शिव, आणि दिलं अमरत्वाचं वरदान.

Markandeshwar Temple | Sakal

निसर्ग आणि शांततेचा मिलाफ

वैणगंगा नदीच्या शांत लाटांमध्ये मंदिराचं प्रतिबिंब – एक अलौकिक अनुभव.

Markandeshwar Temple | Sakal

८व्या ते १२व्या शतकातील स्थापत्य

कधीकाळी २४ मंदिरे असलेलं संकुल – आज सहाच उरले, पण त्यांची भव्यता अबाधित.

Markandeshwar Temple | Sakal

कोरीव शिल्पांची गाथा

रामायण, महाभारत, दैवी प्राणी आणि प्रतीकात्मक कथा – प्रत्येक भिंतीवर इतिहास जिवंत!

Markandeshwar Temple | Sakal

वीज आपत्ती आणि पुनर्रचना

वीज पडल्याने मुख्य शिखराचं नुकसान, पण १९व्या शतकात गोंड शासकांनी पुन्हा उभं केलं वैभव.

Markandeshwar Temple | Sakal

गोंड राजांचं योगदान

शिल्पकलेच्या वारशाचं रक्षण करत मंदिराच्या महा मंडपात भक्कम खांब व कमानी घालून दिला आधार.

Markandeshwar Temple | Sakal

आजचं मंदिर – श्रद्धा आणि कलेचा संगम

आजही मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात उभं, भक्तांना अध्यात्मिक ऊर्जा आणि कलात्मक प्रेरणा देतं.

Markandeshwar Temple | Sakal

पंढरपूरची वारी, नगरची तुळशी माळ...दोन शहरं, एक भक्तीचा धागा!

Tulsi mala Ashadhi Wari 2025 | Sakal
येथे क्लिक करा