Aarti Badade
वारीतील श्रद्धा, भक्ती आणि प्रतीक – तुळशीची माळ. पंढरपूरात विकल्या जाणाऱ्या बहुतांश माळा बनतात नगरमध्ये!
वारकऱ्यांचे आराध्य विठोबा तुळशीवर अत्यंत प्रेम करतो. म्हणून तुळस वारकऱ्यांच्या भक्तीचा अविभाज्य भाग बनली आहे.
प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ असते. काही स्त्रिया तर पायी वारीत डोक्यावर तुळस घेऊनच चालतात!
आषाढी वारीच्या काळात पंढरपुरात दररोज जवळपास २० हजार तुळशीच्या माळा विकल्या जातात.
पंढरपूरात मिळणाऱ्या बहुतांश तुळशीच्या माळा नगर शहरातील कुशल कारागीर तयार करतात.
नगरमधील कुटुंबं अनेक पिढ्यांपासून तुळशीच्या माळा बनवण्याचे काम करत आहेत – ही एक भक्तीपरंपरा बनली आहे.
हे कारागीर सुमारे २० ते २५ प्रकारच्या तुळशीच्या माळा तयार करतात – डिझाईन, आकार, प्रकारात विविधता असते.
वारी सुरु झाली की नगरमध्ये माळा तयार करण्याचं कामही जोमात सुरु होतं. आषाढीपूर्वी सगळ्या माळा पंढरपूरला पोहचतात.
या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतो. आणि श्रद्धेची सेवा घडते, याचा कारागिरांना अभिमान वाटतो.