Aarti Badade
तुर्कीतील प्राचीन शहर हिएरापोलिसमध्ये (Hierapolis) एक गूढ मंदिर आहे, ज्याला 'गेट टू हेल' किंवा 'नरकाचे द्वार' म्हणून ओळखले जाते.
Gate to Hell Turkey place
Sakal
असं मानलं जातं की, या मंदिरात प्रवेश करणारा मानव किंवा प्राणी लगेच मरतो. प्राचीन काळात लोक याला दैवी शक्ती किंवा शाप समजत होते.
Gate to Hell Turkey place
Sakal
हे ठिकाण रोमन काळात पाताळातील देव प्लूटो याला समर्पित होते आणि इथं यज्ञ केले जात असत. त्यामुळे प्राचीन काळात याला मृत्यूचे प्रतीक मानले जात असे.
Gate to Hell Turkey place
Sakal
जर्मनीतील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, हे द्वार एका सक्रिय ज्वालामुखी प्रदेशावर आहे. मंदिराच्या खालील भेगेतून कार्बन डायऑक्साइड वायू उत्सर्जित होतो.
Gate to Hell Turkey place
Sakal
कार्बन डायऑक्साइडची घनता हवेपेक्षा जास्त असल्याने, हा विषारी वायू जमिनीजवळ गोळा होतो. जमिनीपासून 40 cm उंचीपर्यंत त्याचे प्रमाण घातक असते.
Gate to Hell Turkey place
Sakal
रात्री आणि पहाटेच्या वेळी सूर्यप्रकाश (Sunlight) नसल्यामुळे या वायूचा प्रभाव सर्वात जास्त असतो. यामुळे गुहेत प्रवेश करणारे सजीव काही मिनिटांतच गुदमरून मरत असत.
Gate to Hell Turkey place
Sakal
विज्ञानाने सत्य उघड केले असले तरी, या वायूच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच सरकारने या जागेभोवती संरक्षक कुंपण लावून लोकांना जाण्यास बंदी घातली आहे.
Gate to Hell Turkey place
Sakal
TV Fun Facts
Sakal