Aarti Badade
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी केवळ सौंदर्यासाठीच नाही, तर त्यांच्याशी जोडलेल्या दंतकथांसाठी प्रसिद्ध आहेत. असाच एक सुंदर तलाव म्हणजे 'उमियाम तलाव', ज्याच्या पाण्याला चक्क 'अश्रूंचे पाणी' म्हटले जाते.
Umiyam Lake Meghalaya tourism Shillong
Sakal
'उमियाम' हे नाव स्थानिक खासी भाषेतून आले आहे. यात 'उम' म्हणजे पाणी आणि 'इयाम' म्हणजे अश्रू. याच शब्दशः अर्थामुळे या तलावाला 'अश्रूंचे सरोवर' म्हणून ओळखले जाते.
Umiyam Lake Meghalaya tourism Shillong
Sakal
लोककथेनुसार, स्वर्गातून दोन बहिणी पृथ्वीवर फिरायला आल्या होत्या. मात्र, वाटेतच एक बहीण हरवली. आपल्या बहिणीच्या विरहात दुसरी बहीण इतकी रडली की, तिच्या अश्रूंनी या विशाल सरोवराची निर्मिती झाली, अशी श्रद्धा आहे.
Umiyam Lake Meghalaya tourism Shillong
Sakal
हे अनोखे तलाव ईशान्य भारताचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या मेघालय राज्यात आहे. शिलाँग शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण वसलेले आहे.
Umiyam Lake Meghalaya tourism Shillong
Sakal
काही स्थानिक लोक या तलावाला 'बारापाणी' या नावानेही ओळखतात. याचा अर्थ 'मोठे पाणी' असा होतो. येथील हिरवेगार डोंगर आणि स्वच्छ निळे पाणी पर्यटकांना भुरळ घालते.
Umiyam Lake Meghalaya tourism Shillong
Sakal
उमियाम तलावाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते एप्रिल हा काळ सर्वात उत्तम आहे. या दिवसात पाऊस कमी असतो आणि वातावरणात आल्हाददायक थंडावा असतो, जो सहलीचा आनंद द्विगुणित करतो.
Umiyam Lake Meghalaya tourism Shillong
Sakal
शहराच्या धावपळीपासून दूर जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल, तर उमियाम तलाव हा एक उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता आणि सुंदर फोटोग्राफी देखील करू शकता.
Umiyam Lake Meghalaya tourism Shillong
Sakal
Chhatrapati Ramraje Lived Secretly Pangao Village
Sakal