Aarti Badade
पुण्यातील फरासखाना - इलेक्ट्रिक मार्केट रस्त्यावर हे मंदिर आहे. तुम्ही हे जुने मंदिर पाहिले आहे का?
पूर्वी अंगावर पांघरायचे गरम वस्त्र म्हणजे 'पासोडी'. याच वस्त्रामुळे या मंदिराला 'पासोड्या' नाव मिळाले.
मंदिराच्या जवळ पासोड्या विकणारी दुकाने होती. म्हणून शेजारच्या मारुतीला 'पासोड्या मारुती' आणि या मंदिराला 'पासोड्या विठोबा' असे नाव मिळाले.
पूर्वी येथे शिवलिंग असलेली घुमटी, समोर झाड, पारा आणि पाण्याचा हौद होता.
एक जुनी गोष्ट आहे की, शिवाजी महाराज संत तुकोबांच्या कीर्तनाला येथे आले होते. त्यांनी मोगलांच्या वेढ्यातून सुटका केली.
१८१० च्या एका जुन्या यादीत या जागेचा उल्लेख आहे. पण त्यात विठोबा मंदिराचा उल्लेख नाही. कदाचित इंग्रजी राजवटीत हे मंदिर बांधले गेले असावे.
१९०४ मध्ये मंदिराची पहिली दुरुस्ती झाली. त्यानंतर १९२८ मध्ये त्याला दुसरा मजला बांधला. नारायण महाराजांनी कळस बसवला.
१९२८ पासून या मंदिरात अखंड हरिनामाचा गजर आजही सुरू आहे. ही पुण्यातील एक मौल्यवान भक्ती परंपरा आहे.
हे दुमजली मंदिर आहे. आत एक छोटा सभामंडप आहे. गाभाऱ्यासमोर संगमरवरी नंदी आहे. गाभाऱ्यात काळी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आहे.