हत्ती सफारीसाठी प्रसिद्ध आहे 'हा' ऐतिहासिक किल्ला!

Aarti Badade

आमेर शहराचे सौंदर्य

राजस्थानमधील जयपूरजवळ 'माओता' तलावाच्या काठावर, एका उंच टेकडीवर भव्य 'अंबर' किंवा 'आमेर' किल्ला वसलेला आहे.

Amber Fort Jaipur

|

Sakal

इतिहासाची साक्ष

राजा मानसिंह यांनी १६ व्या शतकात बांधलेला हा किल्ला युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाने समाविष्ट आहे.

Amber Fort Jaipur

|

Sakal

राजेशाही हत्ती सफारी

येथील हत्ती सफारी पर्यटकांना थेट राजेशाही काळात घेऊन जाते; संध्याकाळी होणारा 'लाईट अँड साऊंड शो' पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

Amber Fort Jaipur

|

Sakal

वास्तुकलेचा अजोड नमुना

हा किल्ला लाल वाळूचा दगड आणि पांढऱ्या संगमरवरापासून बनलेला असून, यात हिंदू आणि मुघल वास्तुकलेचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते.

Amber Fort Jaipur

|

sakal

भव्य शीश महाल

किल्ल्याच्या आत असलेला जगप्रसिद्ध 'शीश महाल', विस्तीर्ण अंगण आणि तलावाचे निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

Amber Fort Jaipur

|

Sakal

राजपूत राजांची राजधानी

आमेर किल्ला हा ऐतिहासिक काळातील कछवाहा राजपूत राजांची राजधानी होता, जो आजही आपल्या भव्यतेने उभा आहे.

Amber Fort Jaipur

|

sakal

जयपूरमधील इतर आकर्षणे

आमेर किल्ल्यासोबतच तुम्ही हवा महल, सिटी पॅलेस, जंतर मंतर आणि नाहरगड किल्ल्याला भेट देऊन राजस्थानच्या संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता.

Amber Fort Jaipur

|

Sakal

कोकण फिरण्याचा प्लॅन करताय? 'या' 5 ठिकाणांना नक्की द्या भेट!

Konkan tourism in summer

|

sakal

येथे क्लिक करा