Aarti Badade
ताजमहल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. त्याच्या अद्भुत वास्तुकलेसाठी तो ओळखला जातो, पण त्याचे एक ऐतिहासिक रहस्य आहे.
Taj Mahal Gold kalash
Sakal
एक काळ असा होता, जेव्हा ताजमहलच्या शिखरावर ४६६ किलो वजनाचा शुद्ध सोन्याचा कळस होता—त्याची आजची किंमत सुमारे ४८४ कोटी आहे!
Taj Mahal Gold kalash
Sakal
हा ३० फूट उंच सोन्याचा कळस मुमताज महलच्या आठवणीत बांधलेल्या या स्मारकाच्या भव्यतेचे आणि मुघल स्थापत्यशैलीचे प्रतीक होता.
Taj Mahal Gold kalash
sakal
'तवारीख-ए-आगरा'नुसार, हा कळस शाही खजिन्यातील सोन्यातून बनवला गेला होता आणि लाहोरमधील काझीम खानच्या देखरेखीखाली बनवण्याचे काम झाले.
Taj Mahal Gold kalash
Sakal
१८१० मध्ये ब्रिटिश अधिकारी जोसेफ टेलरने ताजमहलचा मूळ सोन्याचा कळस काढून टाकला. या सोन्याची चोरी झाली असावी, असे मानले जाते.
Taj Mahal Gold kalash
Sakal
मूळ सोन्याच्या कळसाच्या जागी सोन्याचा मुलामा (Gold-plated) दिलेला तांब्याचा कळस बसवण्यात आला. त्यानंतर १८७६ आणि १९४० मध्ये तो पुन्हा बदलला गेला.
Taj Mahal Gold kalash
Sakal
आज आपण जो कळस पाहतो, तो १९४० मध्ये बसवलेला चौथा कळस आहे. मूळ कळसासारखा भव्य नसला तरी ताजमहलचे सौंदर्य आणि इतिहास आजही कायम आहे.