Aarti Badade
रामायणात अनेक आदर्श पात्रे आहेत, पण प्रभू श्रीराम आणि माता सीतेनंतर केवळ हनुमानाचीच स्वतंत्र मंदिरे जगभरात का आढळतात? जाणून घेऊया त्यामागचे रहस्य.
Mystery of Hanuman Temples
Sakal
अंजनीपुत्र हनुमानाने जन्मतःच सूर्याला फळ समजून झेप घेतली होती. त्याच्या या अचाट शक्तीमुळे सर्व देवांनी त्याला अजिंक्य होण्याचे वरदान दिले होते.
Mystery of Hanuman Temples
Sakal
लहानपणीच्या खोड्यांमुळे ऋषींनी हनुमानाला शाप दिला होता की, जोपर्यंत कोणी आठवण करून देणार नाही, तोपर्यंत त्याला स्वतःच्या अफाट शक्तीचा विसर पडेल.
Mystery of Hanuman Temples
Sakal
सीतेच्या शोधात समुद्र ओलांडताना जेव्हा सर्व वानरसेना चिंतेत होती, तेव्हा जांबुवंताने हनुमानाला त्याच्या विसरलेल्या शक्तीची आठवण करून दिली आणि हनुमानाचे देवत्व उजळून निघाले.
Mystery of Hanuman Temples
Sakal
लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे रामाचे भाऊ होते, तर सुग्रीव-बिभीषण हे मित्र. त्यांनी त्याग आणि निष्ठेचे आदर्श ठेवले, पण हनुमानाने 'दास्य भक्ती'चा सर्वोच्च शिखर गाठला.
Mystery of Hanuman Temples
Sakal
हनुमानाने केवळ सेवाच केली नाही, तर बुद्धिमत्ता आणि अथांग भक्तीच्या जोरावर भक्तांच्या हृदयात स्थान मिळवले. यामुळेच रामाच्या परिवारात हनुमान 'देव' म्हणून पूजला जाऊ लागला.
Mystery of Hanuman Temples
Sakal
येत्या २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंती साजरी होत आहे. भक्ती आणि शक्तीचा हा संगम आपल्याला संकटात ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो.
Mystery of Hanuman Temples
Sakal
Historical places in Mumbai
Sakal