सकाळ वृत्तसेवा
महात्मा फुले यांनी शिवरायांना 'कुळवाडीभूषण' संबोधले, कारण त्यांनी कृषी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.
शिवरायांचे स्वराज्य केवळ राजकीय नव्हते. त्यांनी शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणावरही भर दिला. मात्र, कृषी स्वराज्याचा स्वतंत्रपणे फारसा उल्लेख आढळत नाही.
शिवरायांच्या पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रांतून शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या अनेक नोंदी सापडतात, ज्या त्यांच्या कृषी दृष्टीकोनाची साक्ष देतात.
शिवरायांनी उभ्या पिकांतून सैन्य जाऊ नये, यावर बंदी घातली. नाइलाज झाला, तर नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांची कोणतीही वस्तू जबरदस्तीने घेऊ नये, गरज असल्यास त्याची किंमत अदा करूनच ती घ्यावी, असे सक्त आदेश महाराजांनी दिले.
वतनदारी पद्धतीत शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. त्यामुळे शिवरायांनी ती बंद करून थेट रयतवारी पद्धत लागू केली.
पावसाळ्यात चार महिने लष्कराला पगारी सुट्टी मिळत असे. हे सैनिक शेतीच्या कामात मदत करत, ज्यामुळे उत्पादन वाढत असे.
शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा दुहेरी मार्ग आखून दिला, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होऊन खरी कृषी समृद्धी घडली!