Anuradha Vipat
अभिनेता संजय दत्त याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
संजूबाबा उद्योग क्षेत्रात देखील सक्रिय आहे.
संजूबाबाने गेल्या वर्षी दारु विकण्याचा व्यवसाय सुरु केला.
संजूबाबाचा स्वतःचा एक व्हिस्की ब्रँड आहे. संजूबाबाच्या व्हिस्कीचं नाव ‘द ग्लेनवॉक’ असं आहे.
हा ब्रँड कार्टेल आणि ब्रदर्सने सुरू केला आहे आणि संजय दत्तच्या लोकप्रियतेमुळे तो बाजारात अधिकाधिक लोकप्रिय झाला आहे.
माहितीनुसार, यंदाच्या वर्षी पहिल्या चार महिन्यांमध्ये “द ग्लेनवॉक” च्या 1,20,000 बाटल्या विकल्या गेल्या आहेत
या कालावधीत ब्रँडने जवळपास 19.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे .