Aarti Badade
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील स्प्रूस क्रीक हे गाव अनोख्या कारणासाठी प्रसिद्ध आहे – इथल्या प्रत्येक घराबाहेर खाजगी विमान पार्क केलेले असते.
स्प्रूस क्रीकमधील प्रत्येक रहिवाशाकडे स्वतःचे खाजगी जेट आहे. हे गाव डेटोना बीचजवळ वसलेले आहे.
इतर लोक प्रवासासाठी ऑनलाईन तिकीट बुक करतात, पण इथले लोक स्वतःच्या विमानाने प्रवास करतात!
हे गाव 1974 मध्ये दुसऱ्या महायुद्धातील माजी नौदल हवाई तळावर विकसित करण्यात आले.
स्प्रूस क्रीक गाव सुमारे १२०० एकर क्षेत्रात पसरले असून येथे सुमारे ५,००० लोक राहतात.
गावाच्या मध्यभागी ४,००० फूट लांबीची धावपट्टी, नियंत्रण टॉवर व GPS प्रणाली आहे.
येथे हेलिपॅड आणि सी प्लेन उतरवण्यासाठी विशेष बेस सुद्धा बांधण्यात आला आहे.
प्रत्येक शनिवारी गावकरी तीन विमानांच्या गटात उड्डाण करून शेजारील विमानतळांवर जाऊन नाश्ता करतात.
स्प्रूस क्रीक हे जगातील एकमेव असे खासगी विमानधारकांसाठीचे गाव आहे, जिथे घरापासून थेट विमानात बसून उड्डाण करता येते!