Aarti Badade
भारतात सहज उपलब्ध असलेली भेंडी अमेरिकेत मात्र खूप महाग आहे. जाणून घ्या कारणं आणि किंमतीतला फरक.
अमेरिकेत अनेक भारतीय वास्तव्य करत असल्यामुळे भेंडीसह अनेक भारतीय भाज्या तिथेही विकल्या जातात.
भारतात भेंडी, वांगी, भोपळा प्रिय असतात, तर अमेरिकन लोक ब्रोकोली, लेट्यूस आणि कॉर्नला प्राधान्य देतात.
भारतात भेंडीची शेती उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रात होते, तर अमेरिकेत ती फ्लोरिडा, जॉर्जिया आणि टेक्सासमध्ये केली जाते.
भारतात भेंडी ही रोज खाल्ली जाणारी सामान्य भाजी आहे, तर अमेरिकेत ती विशेष आणि महागड्या भाज्यांमध्ये समाविष्ट आहे.
अमेरिकेत भेंडी ही आफ्रिकन, कॅरिबियन व आशियाई समाजात वापरली जाते आणि मुख्य प्रवाहात ती दुर्मिळ आहे.
बहुतेक वेळा भाज्या ग्रिल करून, वाफवून किंवा बटरमध्ये परतून खाल्ल्या जातात, तर सॅलडमध्ये कच्च्या भाज्यांचाही वापर होतो.
भारतात भेंडी ₹२० ते ₹६० प्रति किलो दरम्यान मिळते, विविध राज्यांनुसार किंमतीत थोडाफार फरक असतो.
अमेरिकेत भेंडीची किंमत ₹५०० ते ₹९५० प्रति किलोपर्यंत जाते, त्यामुळे ती सर्वसामान्यांसाठी परवडणारी भाजी नाही.
भारतात ऑनलाइन भेंडी ₹७० ते ₹१०० दरम्यान मिळते, पण अमेरिकेत ती ₹६०० ते ₹९०० प्रति किलो दराने विकली जाते.