Aarti Badade
दिल्लीतील 'हॉटेल दर्यागंज' हे बटर चिकनसाठी प्रसिद्ध आहे आणि इथूनच या ऐतिहासिक खाद्यप्रवासाची सुरुवात झाली.
हॉटेल दर्यागंजचे मालक शार्क टॅंकमध्ये गेले आणि अमन गुप्ताकडून ९० लाख रुपयांचे फंडिंग मिळवले.
बटर चिकनचा शोध लावणारे कुंदनलाल गुजराल हे पेशावरमध्ये एका कबाबच्या दुकानात काम करत होते.
१९२२ मध्ये, कुंदनलालनं दुकानात तंदुर भट्टीचा वापर केला, जो नान आणि कबाबसाठी होता.
एक दिवस मुखा सिंग आजारी असताना, कुंदनलालनं तिखट, दही आणि मसाल्यात मुरवलेली अख्खी कोंबडी तंदुरमध्ये भाजली.
यामुळेच जगातली पहिली तंदुरी चिकनचा जन्म झाला.
तंदुरी चिकन खूप प्रसिद्ध झालं आणि पेशावरच्या प्रत्येक गल्लीत मिळू लागलं. फाळणीनंतर भारतात येऊन कुंदनलालनं बटर चिकनचा शोध लावला.
फ्रीज नसल्याने आणि माणसांचा अंदाज कधी चुकला की तंदुरी चिकन उरायच मग त्या उरेलला चिकनपासून त्यांनी मुर्ग मखनी म्हणजेच बटर चिकन हा पदार्थ बनवला.
आजही कुंदनलाल गुजराल यांचे नातू या परंपरेला पुढे नेत आहेत आणि त्यांच्या हॉटेलचा मासिक सेल ३ कोटी रुपये आहे.