सकाळ डिजिटल टीम
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात नागा साधूंची चर्चा सुरू आहे. त्यांचा नागा साधू होण्याचा प्रवास अतिशय वेदनादायी आणि कठीण असतो.
नागा होण्यासाठी साधूला अवधूत बनण्याची परीक्षा पार करावी लागते. यात मुंडन करून स्वतःच्या मृत्यूचे विधी जिवंत असताना करावे लागतात.
नागा साधू होण्यासाठी त्यांना आखाड्यात जाऊन कठीण परीक्षांमधून जावे लागते. व्यक्तीच्या आणि कुटुंबाच्या तपासणीसह प्रवेश दिला जातो.
नागा साधूंना दिवसातून एकदाच जेवण घेता येते. त्यासाठी त्यांना भीक मागावी लागते, आणि सात घरातच भीक मागता येते.
नागा साधू होण्यासाठी ब्रह्मचर्याची कठीण चाचणी घ्यावी लागते, जी 6 महिन्यांपासून 12 वर्षांपर्यंत चालू राहू शकते.
नागा साधू बनण्याची प्रक्रिया अत्यंत वेदनादायी असते, ज्यात त्याच्या लिंगाची विशेष पद्धतीने "टांगतोड" केली जाते, ज्यामुळे ते नपुंसक बनतात.
नागा साधू कधीही पलंगावर किंवा खाटेवर झोपू शकत नाही. ते फक्त जमिनीवर झोपतात, आणि हा एक कडक नियम पाळला जातो.