सकाळ डिजिटल टीम
महाकुंभ मेळाव्यात तीन अमृत स्नान पूर्ण झाले आहेत आणि आता आखाडे रिकामे होऊ लागले आहेत.
लाखो नागा साधू महाकुंभ मेळाव्यात अमृत स्नानासाठी येतात, पण त्यानंतर ते कोठे गायब होतात?
नागा साधू महाकुंभानंतर त्रिवेणी संगमात स्नान करून छावणीत परत येतात आणि पंच परमेश्वराची निवड प्रक्रिया सुरु होते.
पूजा आणि हवन केल्यानंतर नव्या पंचाची निवड केली जाते आणि मग ते काशीच्या दिशेने निघतात.
काशीतील शिवरात्रि आणि मसानची होळी खेळून ते आपापल्या गंतव्य स्थानी निघतात. काही नागा साधू हिमालय, बद्रीनाथ, केदारनाथ, जम्मू-कश्मीर, नर्मदाखंड आणि नेपाळमध्ये जातात.
नागा साधू संपूर्ण भारतात आणि जगभर विविध स्थानिक आखाड्यात सेवा करतात. ते जिकडे त्यांचे स्थानिक आखाडे आहेत तिकडे जातात.
नागा साधूंचं प्रमुख कार्य धर्माचे रक्षण करणे आहे.
नागा बाबा दिगंबर दर्शन गिरी महाराजांनी एका खाजगी चॅनलशी बोलताना ही माहिती दिलेली आहे.