संविधान सभेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 10 महिलांबद्दल जाणून घ्या

Puja Bonkile

संविधान

आज संविधान दिनानिमित्त  संविधान सभेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या १० महिलांबद्दल जाणून घेऊया.

दाक्षायानू वेलायुधन

भारताच्या संविधान सभेतील एकमेव दलित महिला होत्या. त्यांचा जन्म केरळमध्ये झाला. या दलित समाजातील पुलायर जातीतील होत्या. त्या काळात त्यांनी विज्ञानात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यांनी अनेक सामाजिक कार्यात मोलाची कामगिरी केली.

सुचेता कृपलानी

या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आघाडीच्या सैनिक होत्या. भारतीतील एक यशस्वी राजकारणी म्हणून यांच्या कारकीर्द प्रभावी ठरली.

सरोजनी नायडू

भारतीची कोकीळी म्हणून ओळख मिळालेल्या सरोजनी नायडू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या व कवयित्री अस अनेक क्षेत्रात त्यांना नवालौकिक मिळवला होता.

विजय लक्ष्मी पंडित

यांचा जन्म नेहरु कुटुबांत झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या शिलेदार व स्वातंत्र्योत्तर भारतातील मुत्सदी राजकारणी म्हणून त्यांनी  छाप पाडली.

हंसा मेहता

या स्वातंत्र्यपूर्व भारतातील आघाडीच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या व समाजसुधारक होत्या. भारतीय राज्यघटनेत शासनाला निर्देशित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची मांडणी करण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

कमला चौधरी

भारतीय सविधान मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेच्या त्या सदस्य होत्या.

पूर्णिमा बॅनर्जी

धर्मनिरपेक्षतेविषयी त्यांनी संविधान सभेत मांडलेली मतं ही वेगळ्या धाटणीची होती.

लीला रॉय

१९४६ साली त्या संविधान सभेत नियुक्त झाल्या पूर्णपणे महिलांकडून चालवलं जाणारं मासिक म्हणून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

महिनाभर ओट्स खाल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Oats

|

Sakal

आणखी वाचा