नवरात्री विशेष युद्धभूमीतील दुर्गा, झाशीच्या राणीचे शौर्य आणि पराक्रम!

Aarti Badade

झाशीची राणी

झाशीची राणी लक्ष्मीबाई (१८२८-१८५८) या भारतीय इतिहासातील एक महान वीरांगना आणि १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील एक प्रमुख सेनानी होत्या.

Rani Lakshmibai

|

Sakal

जन्म आणि बालपण

  • नाव: मणिकर्णिका तांबे

  • जन्म: १९ नोव्हेंबर १८२८, वाराणसी

  • कौटुंबिक पार्श्वभूमी: एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या मनूने (मणिकर्णिका) लहानपणापासूनच तलवारबाजी आणि घोडस्वारीचे प्रशिक्षण घेतले.

Rani Lakshmibai

|

Sakal

झाशीची राणी

मणिकर्णिका यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. राजांच्या मृत्यूनंतर त्यांनी दत्तक पुत्र दामोदर राव यांच्यासह झाशीचे राज्य सांभाळले.

Rani Lakshmibai

|

Sakal

१८५७ चा संघर्ष

ब्रिटिशांनी झाशीचे राज्य हडपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी "मी माझी झाशी देणार नाही!" असे सांगून कडवा प्रतिकार केला.

Rani Lakshmibai

|

Sakal

अतुलनीय शौर्य

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधून घोड्यावर स्वार होऊन ब्रिटिशांशी शौर्याने लढा दिला. त्यांचा हा पराक्रम आजही प्रेरणा देतो.

Rani Lakshmibai

|

Sakal

योगदान

केवळ एक योद्ध्याच नव्हे, तर त्यांनी झाशीमध्ये एक समृद्ध आणि सुसंस्कृत राज्य निर्माण केले. त्यांनी कला आणि संस्कृतीलाही प्रोत्साहन दिले.

Rani Lakshmibai

|

Sakal

वारसा

राणी लक्ष्मीबाई या आजही महिला सक्षमीकरण, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.

Rani Lakshmibai

|

Sakal

नवदुर्गांमधील पहिली देवी! कोण आहे शैलपुत्री आणि तिची पूजा का करतात?

Significance and Worship of Devi Shailaputri

|

Sakal

येथे क्लिक करा