Anushka Tapshalkar
आज प्रेग्नन्सी टाळण्यासाठी अनेक महिला सहजपणे गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pills) घेतात, पण या गोळ्यांचा शोध लागताना काही अमानूष गोष्टी घडल्या ज्या वाचून तुम्हाला धक्का बसेल.
Birth Control Pills| Contraceptive Pills
sakal
नवीन गर्भनिरोधक गोळीची चाचणी करण्यासाठी संशोधकांना महिलांची गरज होती.
1950| New Pill Testing
sakal
त्याकाळी आरोग्य हक्क व कायदेशीर संरक्षण जवळजवळ नसलेल्या पुअर्टो रिको(Puerto Rico)तील गरीब महिलांवर ही चाचणी करण्यात आली.
Poor Puerto Rican Women Victims
sakal
या गोळ्यांमध्ये आजच्या तुलनेत अत्यंत जास्त हार्मोन होते. उलट्या, तीव्र अशक्तपणा, रक्तामध्ये गाठी, दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण झाल्या. मात्र महिलांनी दिलेल्या तक्रारी ऐकून घेतल्या गेल्या नाहीत.
Excess Hormornes Present
sakal
या चाचणी दरम्यान किमान तीन महिलांचा मृत्यू झाला. मात्र, कोणत्याही शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली नाही आणि कोणतीही अधिकृत चौकशी सुद्धा कधी झाली नाही.
Resulted 3 Deaths in Testing
sakal
पुअर्टो रिकोमध्ये अमेरिकेचे कडक वैद्यकीय नियम लागू नव्हते. स्थानिक महिलांना विरोध करण्याचे अधिकार कमी होते व मुख्य भूमीवरील डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांना धोक्यात घालायचे नव्हते.
Why Only Puerto Rico
sakal
1960 मध्ये अनेक तक्रारी आणि धोके असूनही या गोळीला FDA ची मान्यता मिळाली. बाजारात आलेल्या पहिल्या सँपल्समध्ये अजूनही खूप जास्त हार्मोन डोस होता.
Approval from FDA in 1960
sakal
आज गर्भनिरोधक गोळी महिलांना स्वातंत्र्य देते, पण तिची सुरुवात अनामिक महिलांच्या वेदना, धोके आणि अन्यायातून झाली. त्यांची कहाणी आजही इतिहासात क्वचितच वाचायला मिळते
Today's Reality
sakal