सकाळ वृत्तसेवा
वीरजी व्होरा हा १६व्या शतकातील सर्वात श्रीमंत व्यापारी होता. सुरतमध्ये त्याचा मोठा व्यापारी गड होता आणि तो इस्ट इंडिया कंपनीला कर्जही देत असे!
डच रेकॉर्ड्सनुसार, वीरजी व्होराकडे ८० लाख रुपये वैयक्तिक संपत्ती आणि कोट्यवधींची व्यापारी उलाढाल होती. तेव्हाच्या १ कोटी रुपयांची आजच्या काळातील किंमत सुमारे ७५०० कोटी रुपये होते!
त्याच्या व्यवसायाचा विस्तार सात देशांमध्ये होता. भारतात तो आग्रा, सुरत, भडोच, गोवलकोंडा, मद्रास यांसारख्या ठिकाणी व्यापारी उलाढाल करत असे.
शिवाजी महाराजांनी सुरत लुटीपूर्वी वीरजी व्होरा आणि इतर चार व्यापाऱ्यांना चेतावणी दिली मात्र, वीरजीने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा मोठा फटका बसला.
शिवरायांनी सुरतवर हल्ला केला आणि वीरजी व्होराच्या सर्व गोदामांना आणि पेढ्यांना साफ केले. हजारो किलो सोने, चांदी, मोती, हिरे आणि लाखो रुपये रोख लुटले गेले!
मराठ्यांनी वीरजीच्या घरातून ६००० किलो सोने, २८ पोती भरून मोती-रत्ने आणि ५० लाख रुपये रोख हस्तगत केले. हा साक्षात कुबेराचा खजिना होता!
पहिल्या लुटीतून सावरायला काही वर्षे गेली, तोपर्यंत शिवरायांनी दुसऱ्यांदा सुरतवर हल्ला केला! यामुळे वीरजीचा व्यवसाय कोसळला आणि तो अंथरुणाला खिळला.
एकेकाळी मुघल साम्राज्याला कर्ज देणारा वीरजी शिवरायांच्या तडाख्यातून सावरू शकला नाही. १६७५ मध्ये तो धक्क्यातच मरण पावला! संदर्भ: डच रेकॉर्ड्स, इस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड्स