सकाळ डिजिटल टीम
कांदा हा आपल्या रोजच्या जेवणाचा एक सामान्य भाग आहे; पण तो कापताना आपण का रडतो हे तुम्हाला माहिती आहे का?
कांदा खाण्याचे फायदे केवळ त्याच्या चवीपुरते मर्यादित नाहीत, तर ते शरीरासाठी देखील फायदेशीर आहे.
कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी ६, सी, ई, सोडियम, पोटॅशियम, लोह, आहारातील फायबर यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
कांद्यामध्ये फॉलिक अॅसिड देखील आढळते, जे शरीरासाठी आवश्यक आहे.
कांद्यामध्ये Syn-propanethial-S-oxide नावाचे रसायन असते आणि या रसायनामुळे आपल्या डोळ्यांत जळजळ होते आणि अश्रू येतात.
जेव्हा कांदा कापला जातो, तेव्हा Lachrymatory Factor Synthase नावाचे एंजाइम हवेत मिसळते आणि सल्फेनिक अॅसिडमध्ये (Sulfenic Acid) बदलते, त्यामुळे आपल्या डोळ्यांत अश्रू येतात.
कांदा कापताना काही खबरदारी घेतल्यास डोळ्यांची जळजळ कमी करता येते. जसे की, कांदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे किंवा पाण्यात बुडवून कापल्यानंतर तो कापणे.