पोटाची चरबी हट्टी आहे? जिम नाही, औषध नाही! फक्त या 3 गोष्टींनी कमी करा वजन!

Aarti Badade

वाढत्या वजनाची समस्या

आजकाल वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. बिघडलेल्या लाईफस्टाइलमुळे शरीरात इतर आजार घर करतात, त्यामुळे वेट लॉस करणे गरजेचे आहे.

Sakal

सकाळच्या सवयी महत्त्वाच्या

वेट लॉससाठी जिम आणि डाएट महत्त्वाचे आहेतच, पण सकाळच्या निरोगी सवयी अंगीकारणे जास्त आवश्यक आहे. दुपारच्या आधी फक्त ३ गोष्टी फॉलो करा!

Sakal

सकाळी लवकर उठा

सकाळी लवकर उठल्यानं आपल्या चयापचय प्रक्रियेला (Metabolism) गती मिळते. यामुळे अधिक कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. उठल्यावर लगेच योगा किंवा व्यायाम करा.

Sakal

नाश्ता स्किप करू नका

वजन कमी करताना नाश्ता (Breakfast) कधीही स्किप करू नका. नाश्ता केल्याने दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते आणि भूकेवर नियंत्रण राहते.

Sakal

हेल्दी नाश्ता निवडा

नाश्त्यात फळे, दही, ओट्स किंवा इतर हेल्दी पदार्थ खा. बाहेरचे पदार्थ टाळून घरी तयार केलेले पदार्थ खाण्यावर भर द्या.

Sakal

भरपूर पाणी प्या

दिवसभरात भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने चयापचय गती वाढते आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात. सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा.

Sakal

इतर आवश्यक टिप्स

वजन कमी करण्याचा प्रवास सोपा करण्यासाठी इतर टिप्स: नीट चावून खा, जेवताना टीव्ही/फोन टाळा, रात्री लवकर जेवण करा आणि ७-८ तास पुरेशी झोप घ्या.

Sakal

शरीर देतंय इशारा! आतड्याच्या कर्करोगाचे '7' सायलेंट संकेत...वेळीच ओळखा

Colorectal Cancer

|

Sakal

येथे क्लिक करा